नवीन शैक्षणिक धोरण

  • 1.8k
  • 774

नवीन शैक्षणिक धोरणाची पायमल्ली;दोष कोणाचा? अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०(संस्कार)१२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपुर आज शिक्षणाचे सार्वत्रीकीकरण करणे सुरु केले जात आहे.प्रत्येक मुल शिकले पाहिजे यासाठी शिक्षणाचे धोरण राबविले जात आहे.त्यासाठी केंद्रच नाही तर राज्यसरकारही प्रयत्न करीत आहे.सरकारने त्यासाठी आपले पाऊल उचलले आहे.सरकारला वाटत आहे की आपण जे पाऊल उचलले, ते कायद्यानुसार बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी सन २०१४ ला सत्तेवर बसल्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी जुन्या शिक्षणाला बाजुला सारुन नवीन आराखडा तयार केला.त्यानुसार मोदी साहेबांनी एका वेगळ्याच शिक्षणावर भर दिला.ते म्हणजे स्कील डेव्हलपमेंट अर्थात कौशल्य शिक्षण.त्यानुसार विद्यार्थ्यात काही उपजत सुप्त गुण असतात.त्या गुणात वाढ करणे.ह्याच मुद्याला काँग्रेस सरकारमध्येही