शिक्षण घ्या हो शिक्षण ? अलीकडे शिक्षणाला फार महत्व प्राप्त झाले आहे. अगदी जन्मापासून नाही तर गर्भापासून सुरु होणारे शिक्षण हे माणसाच्या चांगल्या उभारणीसाठी प्रेरणादायक ठरु शकते. असं हे शिक्षण. डाॅ. बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचं दूधंही म्हटलं आहे. शिक्षण आईच्या गर्भातही मिळत असते. असं म्हटल्यास लोकांना आश्चर्य वाटेल. परंतू ते सत्य आहे. आपण ऐकलं आहे अभिमन्यूची गोष्ट. त्यानं गर्भातच चक्रव्यूह भेदण्याची कला हस्तगत केली होती. ती दंतकथा वाटते. परंतू आजही बरीचशी मुलं आईच्या गर्भातच शिकत असतात. तो बाळ गर्भात असतांना त्याची आई ही कशी वागली. तिनं कोणकोणत्या गोष्टी केल्या. तिनं परिस्थितीशी कोणती जुळवाजुळव केली. तसंच तिनं काय प्राशन केलं. यावरुन मनुष्याचे