घर बांधणे आहे

  • 813
  • 314

घर बांधणे आहे घर बांधणे आहे असा ध्यास प्रत्येकांच्या मनात असतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण मानव जन्म घेतला ना. मग एकतरी घर बांधावं. घर मोठं जरी नसलं तरी चांगलं असावं. त्यासाठी कोणी कर्ज काढत असतात आणि घर बांधत असतात.घर बांधण्यासाठी कोणी चो-याही करतांना पाहिले. कोणी सर्रास चोरीही करीत असतात. घर बांधणा-यांच्या गर्दीत हवसे, नवशे व गवसेही असतात. हौसेे म्हणजे हौशीनं घर बांधणं. याचाच अर्थ असा की ज्यांना घर बांधण्यात आनंद वाटत असतो असे. नवशे अर्थात असे की जे माझंं घर बनावं यासाठी देवाजजवळ साकडे घालतात असे आणि गवसे म्हणजे ज्यांना घर बांंधायची इच्छा नसते, परंतू जवळ जो पैसा असतो.