आईनं बाळाचं संगोपन करावं?

  • 2.2k
  • 921

प्रत्येक आईनं आपल्या बाळाचे संगोपन करावं! प्रत्येकच आई बाळाला जन्म देत असते. ती आपल्या बाळाचं संगोपन करीत असते. त्याला खावूपिऊ घालण्यापासून तर त्याला कपडेलत्ते घेवून देण्यापर्यंत तसंच पुढं त्याला शिक्षण देण्यापर्यंतही आई आपल्या बाळासाठी करीत असते. ती आपल्या बाळासाठी आपला देह झिजवीत असते हे अगदी खरं आहे. परंतू याला काही अपवादही आहेत. काही काही महिला ज्या नोकरी करीत असतात. त्याही महिला आपल्या इवल्याशा बाळाला त्याचं चांगलं संगोपन व्हावं म्हणून त्याला पाळणाघरात टाकत असतात किंवा त्याच्यासाठी आयांचा बंदोबस्त करीत असतात. जणू आपला बाळ आपलाच आहे अशाप्रकारचे वर्तन करीत असतात. काही काही माता याला अपवाद आहेत. त्या बाळाचं संगोपन करणं सोडा, त्या