वाढती बेरोजगारी;एक भीषण समस्या की शिक्षणाचा परीणाम आज देशात बेरोजगारी वाढलेली दिसत आहे.जग चंद्रावर जरी जात असले तरी दुसरीकडे बेरोजगारीने आत्महत्या होतांना दिसत आहे.याला जबाबदार जर कोण असेल तर आपण सरकारवर दोष देवून मोकळे होतो.खरंच वाढत्या बेरोजगारीला सरकार जबाबदार आहे का?याचं उत्तर नाही असंच येईल. शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे असं मानतात.खरंही आहे.मग जो हे दुध प्राशन करेल तो गुरगुरेल असंही म्हटलं जातं.तेही खरं आहे.मग अलिकडे हेच वाघिणीचं शिक्षणरुपी दुध प्राशन केलेले,दुध प्रेमी गुरगुरत का नसावे ते कळत नाही.वाटल्यास त्यांनी हे दुध प्राशन केल्यानंतर लाथ मारुन पाणी काढायलाच पाहिजे अर्थात बेरोजगारीवर मार्ग काढायलाच पाहिजे.पण तसे होत नाही.ही बेरोजगार मंडळी आत्महत्या