नटण्यावर प्रश्न चिन्हं नसावं?

  • 2.1k
  • 795

नटण्यावर प्रश्नचिन्हं नसावं अलीकडे महिला जास्त साजश्रृंगार करतांना आढळतात. याचा अर्थ असा नाही की पुर्वी साजश्रृंगार नव्हता. पुर्वीही साजश्रृंगार होता. पुर्वी महिला साजश्रृंगार करतांना अति प्रमाणात साजश्रृंगार करीत नसत. परंतू त्या साजश्रृंगार करीत. तसाच साजश्रृंगार पुरुषही करीत. परंतू काळ बदलला व बदलत्या काळानुसार पुरुषांनी नटणेपणा सोडला. महिलांनी तो सोडलेला नाही. पुर्वीचा या साजश्रृंगाराबाबतचा इतिहास जर पाहिला तर या इतिहासात अश्मयुगाचं वर्णन हिरीरीनं करावं लागेल. अश्मयुगात ज्यावेळी माणूस झाडावरुन जमिनीवर आला, तेव्हा माणसं अलंकार म्हणून दगडाचा वापर करीत असत. त्यावेळी ते दगडापासून छोटे छोटे मणी बनवत असत. त्यानंतरचा काळ म्हणजे नवाश्मयुग. या काळात माणसानं हाडाचे अलंकार बनवले होते. त्याच काळात विशेषतः