किमयागार - 31

  • 2.5k
  • 1.1k

किमयागार -मक्तूब - Girishवृद्ध प्रमुखाने इशारा केल्यावर सर्व उभे राहिले. चर्चा संपली होती. हुक्के विझवले गेले. पहारेकरी त्यांच्या स्थानावर उभे राहिले. प्रमुख परत बोलू लागले. आपण उद्या पासून ओॲसिसवर हत्यार बाळगू नये हा नियम बदलतं आहोत. पूर्ण दिवस आपण शत्रू वर लक्ष ठेवायचे आहे. सूर्यास्त झाल्यावर सगळ्यानी शस्त्रे माझ्या ताब्यात द्यायची आहेत. शत्रूच्या १० मृत माणसामागे एक सोन्याचे नाणे दिले जाईल.पण समोरच्यानी हल्ला केल्याशिवाय कोणीही हत्यार वापरायचे नाही. हत्यारे पण वाळवंटासारखीचं लहरी असतात, वापरली गेली नाही तर ती पाहिजे तेव्हा उपयोगी पडतीलच असे नाही. तरुण आपल्या तंबू कडे निघाला. पोर्णिमेच्या चांदण्याच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होते. तो त्याच्या तंबूच्या दिशेने