किमयागार - 32

  • 2k
  • 867

किमयागार -घुसखोर - दुसऱ्या दिवशी सकाळी अल फायोममधील पाम वृक्षराजी भोवती दोन हजार शस्त्रधारी लोक जमले होते. सूर्य माथ्यावर आला त्यावेळी अंदाजे पाचशे लोक क्षितिजावर दिसू लागले. ते शांतपणे येत असले तरी त्यांच्या जवळ शस्त्रे होती. ते उत्तरेकडून ओॲसिसवर पोहोचले होते. ते एका तंबूसमोर आले आणि त्यांनी त्यांच्या कडील तलवारी,रायफली हातात घेतल्या. आणि त्या रिकाम्या तंबूवर हल्ला केला.ओॲसिस मधील लोकांनी वाळवंटातून आलेल्या सैनिकांना घेरले आणि एक तासाच्या आत फक्त एक माणूस सोडला तर बाकीचे घुसखोर मारले गेले होते. ओॲसिस मधील मुलें खजुराच्या झाडांच्या मागील बाजूस होती त्यामुळे त्यांना इकडे काय घडले ते दिसले नव्हते. स्त्रिया आपल्या तंबूत बसून आपल्या नवऱ्यांच्या