बळी

  • 1.1k
  • 369

                            आमावस्येची ती भयाण रात्र , जंगलात लांबवर ऐकू येणारी कोल्हेकुई मध्येच काळीज दडपून टाकणारा एखाद्या घुबडाचा चित्कार , झाडांच्या पानांची अनैसर्गिक होणारी सळसळ , रातकिड्यांची भुणभुण आणि त्या सर्व वातावरणाला भेदून जाणारा शरीराचा थरपाक उडवणारा जीवा मांत्रिकाचा आवाज , जीवा मांत्रिकाच चाललेलं अगम्य अस मंत्र पठन फारच भीती दायक वाटत होत. जंगलाच्या एका झाडाखाली बसून जीवाने त्याच्या पूजेचा पसारा मांडला होता , जवळच भयभीत सुदाम्या इकडे तिकडे बघत थरथरत हात जोडून जीवा समोर बसला होता. जीवा मांत्रिक त्याच्या चिरकलेल्या आवाजात पटापट  मंत्र म्हणत  होता आणि हातासरशी