कधीतरी असे घडावे...

  • 1.3k
  • 393

कधीतरी असे घडावेतू माझा नि मी तुझी व्हावेसुख- दुःखांच्या वाटेवरआपण संगती चालावेकधीतरी असे घडावेतू बोलावेस अन् मी ते ऐकावे बोलता बोलता शब्दांनीसप्तसुरांचे ताल छेडावेकधीतरी असे घडावेतुझे स्वप्न माझे व्हावेतू उन्हात असतानामी तुझी सावली व्हावेकधीतरी असे घडावेतू दीप अन् मी ज्योत व्हावेतुझ्या अखंड तेजानेमी निरंतर तेवत रहावेकधीतरी असे घडावेतू अन् मी एक व्हावेमाझा अतूट विश्वास तूमी तुझा आधार व्हावेमाझा अतूट विश्वास तूमी तुझा आधार व्हावे- प्रियांका कुंभार (वाघ).(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त सौ. प्रियांका कुंभार (वाघ) यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर