किमयागार - 37

  • 1.8k
  • 822

किमयागार -हृदय पुढील तीन दिवस ते हत्यारबंद सैन्याच्या मधून जात होते आणि क्षितिजावर पण सैन्य दिसत होते. तरुणाचे ह्रदय भितीची भाषा बोलू लागले होते. ते त्याला जगद्आत्म्याकडून ऐकलेल्या गोष्टी सांगत होते.अशा माणसांच्या गोष्टी सांगत होते जे खजिन्याच्या शोधात निघाले होते पण अयशस्वी झाले होते.काही वेळा अशी भीती दाखवत असे की तो खजिना शोधू शकणार नाहीच पण तो या वाळवंटात मृत्यू पावेल.काही वेळा ते प्रेम व श्रीमंती दोन्ही मिळाल्यामुळे समाधानी असल्याचे पण सांगत असे.माझे ह्रदय विश्वास घातकी आहे, ते दोघे घोड्यांना विश्रांती देण्यासाठी एके ठिकाणी थांबले तेव्हातरुण किमयागाराला सांगत होता , ते पुढे जाऊ नको असे सांगतेय.ते एका दृष्टीने बरोबरच आहे.