पुराणातील गोष्टी २प्रिथु राजा.ब्रह्मांनी स्वतः प्रिथुला राजाचा मुकुट घातला. याचवेळी इतर भागांचे पण राजेपद दिले. सोम हा वनस्पती, झुडुपे,नक्षत्रे, ग्रह. तर वरुण सुर्यांचा, आदित्यांचा, अग्नी वसुंचा, यम पितर व वंशजांचा, शिव हा यक्ष,राक्षस, पिशाच्चांचा, तर हिमालय पर्वतांचा. समुद्र सर्व नद्यांचा, चित्ररथ हा गंधर्वांचा, वासुकी नागांचा, तक्षक सर्पांचा, गरुड पक्षांचा, वाघ हरिणांचा, ऐरावत हत्तींचा, उच्चश्रवा घोडे गायी बैल यांचा, अश्वथ्थ झाडांचा राजा झाला. ब्रह्मांनी चार दिशांचे दिक्पाल पण नेमले. पुर्वैचा सूधन्वा, पश्चिमेचा केतुमान, दक्षिणेचा शंखपाद, उत्तरेला हिरण्यरोम.प्रिथु राजाने त्याच्या बाणाने जमीन समांतर केली. ही मैदाने गावांना शेती, गुरांना सांभाळण्यासाठी वापरता येऊ लागली. पर्वत इतस्ततः पसरले होते ते निवडक ठिकाणी ठेवले. राजाने