योगीनींचा बेट - भाग १

  • 6.9k
  • 1
  • 3.3k

योगीनींचे बेटभाग१- बेटावरची कातळ शिल्पेअठ्ठ्याहत्तर एकरवर पसरलेले एक अनोखे बेट म्हणजे पाणखोल बेट! चाळीस एक घरे...सुमारे नव्वद माणसे बेटावर वस्तीला.सभोवार पाणी.... भन्नाट वारा...निळ्या आकाशात उडणारे सीगल पक्षी.किनाऱ्याला मासे टिपण्यासाठी टपून बसलेले बगळे. बेटावरून बाहेर जाण्या येण्यासाठी होडी शिवाय दुसरा पर्याय नाही.प्रत्येक कुटुंबाची स्वतःची होडी.या होडीतून मुलांचं शाळेत जाणं व येणं तसच मालवणला बाजारासाठी जाणं येणे होते.बाहेरच्यामाणसाला बेटावर जायचं असेल तर बेटावरूनच एखाद्या होडीवाल्याला बोलवावं लागत. मी व अशोक(माझा मित्र) बेटाजवळ गेलो तेंव्हा आमचा नावाडी(बावकर) तिथे धक्क्यावर हजर होता.पाणखोलच्या खाडीकडे पोहचेपर्यंत पावणेतीन वाजले होते.पोटातले कावळे कोकलून मलूल पडले होते.पण समोरच दृश्य बघितल्यावर डोळ्यांची व पोटाची भूक उलट वाढली .उन्हात चमकणार पाणी...बेभान