मैत्री

  • 6.2k
  • 2.3k

            मित्र,सखा,सोबती,दोस्त असे कितीतरी समानार्थी शब्द मैत्रीसाठी आहेत. आपण लहानपणापासून मित्र बनवतो. आपण जसजसे मोठे होत जातो तसतसा आपला मित्र परिवार वाढत जातो. त्यासोबतच काही बालपणीचे मित्र दुरावतात देखील. पण त्यांच्या आठवणी कधीच दुरावत नाहीत. आनंद व्यक्त करण्यासाठी मित्र आवश्यक आहे. दु:खावर फुंकर घालण्यासाठी मित्र आवश्यक आहे. योग्य दिशा दाखवण्यासाठी मित्र आवश्यक आहे. एवढेच काय आपल्या लग्नाच्या वरातील नाचण्यासाठी देखील मित्र आवश्यक आह. आपल्या आजारपणात मित्र आपलं औषध असतो. आपल्याला झालेल्या जखमेसाठी मित्र मलम असतो. जेथे आपण चुकत असतो तेथे आपल्या कानाला धरुन चांगल्या मार्गावर घेवून येणारा देखील मित्र असतो. आपल्या बद्दल ज्या गोष्टी आपल्या