कोणी काय काय करावं

  • 648
  • 237

कोणी काय करावं म्हणजे देशाचा विकास होईल? *देशात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती यानुसार भारतात अनेक पक्ष आहेत व ते निवडणुकीला उभे राहतात. त्यांनी तसं उभं राहण्यापेक्षा मुख्य राजकीय पक्षांना समर्थन द्यावं. उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नेत्यानं आपल्या लेकरासाठी गडगंज संपत्ती गोळा करु नये. ती मुक्तहस्ते लोकांसाठी खर्च करावी. कारण मरणानंतर कोणीही ती वर नेत नाही. जनतेनंही मुक्तपणानं मतदान करावं. कारण मतदान हे सर्व दानापेक्षा अनमोल अशीच वस्तू आहे ते जनतेनं लक्षात घ्यावं म्हणजे झालं.* भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. ह्या देशात अनेक धर्म व पंथ आहेत. तशाच जाती आहेत. त्याचबरोबर विविध विचारांचे लोकंही आहेत. ते वेगवेगळा विचार करतात आणि वेगवेगळा विचार