ठेच

  • 4k
  • 1.6k

  " धाड्ड" असा मोठा आवाज पूर्ण ऑफिसभर झाला ,  मेहतांच्या कॅबिनचा दरवाजा जोरात बंद करून रागाने पाय आपटत जानव्ही तिच्या  केबिनमध्ये निघून गेली, जानव्ही हि  मेहतांची पर्सनल सेक्रेटरी , तीन वर्षांपूर्वी तिने हे ऑफिस जॉईन केलं होत, दिसायला जेमतेम , स्वस्तातले  कपडे कपडे असायचे तिचे पण त्यातून हि हिला नटायला आवडत,  हे तिच्या राहणीमानातून लख्ख डोकवायचं,  नवीन होती तेव्हा काहीशी अबोल , संकोचलेली,  मेहताने हि अशी मुलगी पी.ए.म्हणून का निवडावी ह्याच सुरवातीला सर्वानाच आश्चर्य वाटलं, पण नंतर मात्र तीच राहणीमान, बोलन , वागण सगळच कस  एकाएकी बदललं एक प्रकारचा आत्मविश्वास आला होता तिच्यात , साधे कपडे घालणारी एक साधारण