प्रेयसीवर सर्वचजण लिहितात पण खरी प्रेयसी असलेल्या पत्नीवर कोणी जास्त लिहीत नाही. पतीसाठी ती स्वत:चं घर, भावंडे, आई-वडील, गाव सर्वकाही सोडून येते. विचार करा हीच गोष्ट उलट असती तर ? लग्नानंतर पुरुषाला या सर्व गोष्टी सोडून पत्नीच्या घरी जावे लागत असते तर? या कल्पनेनेच स्त्रीने आपल्या पतीसाठी केलेला त्याग दिसून येतो. स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्याला बाप बनवणारी पत्नीच आहे. आपल्यासहीत आपल्या आई-वडीलांची, मुला बाळांची काळजी घेणारी आपली पत्नीच आहे. एखादे दिवशी सर्वांना सुट्टी असते पण तिला सुट्टी नसते. स्वयंपाक करणे, भांडे व कपडे धुणे, घर सफाई करणे ही नित्याचीच कामे नव्या ऊर्जेने