एकतर्फी

  • 858
  • 300

                                                 एकतर्फी प्रकरण – १ सकाळचे सात  वाजले होते, रोहिणीची लगबग चालू होती, तिला छोट्या मिनुला शाळेसाठी तयार करायचं होत, श्रीकांतचा टिफ़ीन  बनवायचा होता,  आणि स्वतःला देखील वेळेवर ऑफिस गाठायचं होत , तिची तारेवरची कसरतच सुरु होती पण  श्रीकांत मात्र  शांतपणे चहा घेत रोजच वर्तमानपत्र वाचत बसला होता ,  रोहिणीच्या खूपदा मनात येई “ह्याने निदान मिनुची तयारी तरी  करावी तिला स्कुलबस पर्यंत तरी सोडावं, एकतर ह्याच्याच मुळे मला रोज रात्रीच जागरण होत, रोजच का हवं असत ह्या माणसाला कुणास ठाऊक, एक दिवस म्हणून सुटका नाही, अरे निदान माझ्या तब्बेतीचा तरी विचार करशील कि नाही, त्या दिवशी अंगात ताप असताना देखील