किमयागार - 42

  • 831
  • 216

तरुणाने आकाशाकडे पाहीले आणि त्याला कळले की सर्वत्र शांतता पसरली आहे.आणि अचानक त्याच्या ह्रदयातून उर्मी आली आणि तो प्रार्थना करू लागला. त्या प्रार्थनेत मेंढ्यांना नवीन कुरणे मिळाल्याबद्दल आभार नव्हते, तरुणाला क्रिस्टल विक्रीमध्ये वाढ होण्याची इच्छा नव्हती, तो ज्या स्रीला भेटला होता ती त्याची वाट बघत राहूदे अशी विनंतीही नव्हती.या शांततेत त्याच्या लक्षात आले की, वाळवंट, वारा, सूर्य हे पण परमात्म्याचे संकेत कळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे मार्ग शोधत आहेत आणि 'पाचूच्या गोळी' वर काय लिहिले असावे ते समजण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्याला कळले होते, पृथ्वी व आकाशात शकुन चिन्हे पसरली आहेत आणि त्यांच्या दिसण्यामागे कोणतेही कारण नव्हते.त्याच्या लक्षात आले की