प्रेमाचे वर्णन करावे कसेजणू सप्तसुरांतील सूर भासेव्यक्त न करण्याजोगे सख्या, तुझे अन् माझे हे प्रेम असे 'प्रेम' ही भावनाच मुळात खूप अल्लड असते. प्रेमात बेधुंद होऊन कधी नाचावेसे वाटते तर कधी लहान मूल होऊन आनंदाने बागडावेसे वाटते. कधी मन थोडं खट्याळ होत खोड्या करते तर कधी कधी आवडीच्या व्यक्तीवर रुसूनही बसते. कधी मन समजूतदार होते तर कधी त्याच व्यक्तीवर रागावते. कधी आपल्याला हसवते तर कधी दुःखाच्या खोल दरीत ढकलते. कधी त्या व्यक्तीच्या सतत जवळ राहावेसे वाटते तर कधी त्याच्या सुखासाठी आपल्याला आपोआप दूर करते. असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. प्रेमात काय चूक - काय बरोबर , काय चांगलं - काय