किमयागार - 43

  • 2.2k
  • 882

किमयागार -पिरॅमिडप्रवास परत सुरू झाला. किमयागार म्हणाला, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. तरुणाने आपला घोडा जरा किमयागाराच्या घोड्याजवळ नेला. फार पूर्वी टिबेरीयस हा रोमचा सम्राट होता. त्या राज्यात एक भला माणूस व त्याची दोन मुले राहत होती. एक मुलगा सैन्यात होता आणि तो मोहीमेवर खूप दूर होता. दुसरा मुलगा कवी होता. तो आपल्या कवितांमुळे राज्यात प्रसिद्ध होता. एका रात्री वडिलांच्या स्वप्नात देवदूत आला व म्हणाला, तुझ्या दोन मुलांपैकी एका मुलाचे शब्द प्रसिद्ध होतील आणि अनेक पिढ्या ऐकले जातील. भल्या माणसाला आनंद झाला कारण देवदूताने अभिमान वाटावा अशी गोष्ट सांगितली होती. काही दिवसांनी एक मुलगा रथाखाली सापडत होता, त्याला वाचवताना