मुलगी पळून गेली?

  • 2k
  • 978

*मुलगी पळून गेली काय? मुलीच्या बाजूनं उभी राहा.* *अमूकांची मुलगी पळाली, तमूकांची मुलगी पळाली. समाजात नेहमी असे ताणे ऐकायला मिळत असतात. यात काही मुलींची तिच्या मायबापाची चक्कं हयात निघून जाते. परंतु जे गालबोट लागतं. ते गालबोट काही केल्या पुसलं जात नाही. लोकं दुषणे देवू शकतात. मोठमोठे नावबोटं ठेवू शकतात. परंतु त्या पळून जाण्यापुर्वी त्या का पळून गेल्या? याची साधी शहानिशा करीत नाहीत. हं, दुषणे द्यायला काय जातं? तोंड दिलं आहे विधात्यानं. म्हणूनच आपण कधीकधी विचार न करताही बोलत असतो काहीबाही. परंतु जी मुलगी पळून गेली. तिच्या पळून जाण्यामागे तिची काय मजबुरी होती. ते आपण कधीच समजून घेत नाही वा पळून