मरीमाय - भाग 1

  • 4.6k
  • 1.8k

मरीमाय भाग १      अंगणात कोंबडी पचकन हागली. तसाच शामराव तिच्या पिवळ्या-पातळ हगवणीकडे पहात विचारात गढला गेला होता. समध्या अंगणात कोंबड्या पचपच हागून चिचळ्यानं अंगण सप्पा भरवून ठेवलं होतं. त्याला कोंबडी पोसण्याची आता किळस आली होती. पण याच कोंबड्यांनी त्याला जगवलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे जमेल असाही त्याला विचार आला. त्यांची मुलाबाळाप्रमाणे तो देखभाल करीत राहिला होता.    त्याचं कोंबडीकडे एकसारखं लक्ष गेलं. त्याला ती कोंबडीची झुरणीला आलेली वाटत होती. उकाडा प्रचंड वाढल्याने कपाळावर येणारा घाम त्याने आपल्या दुप्पट्याने पुसला होता. तरीपण सहन न झाल्याने अंगातली बन्यान काढून बाजूला फेकून दिली. पुन:श्च त्याने ती बनियान हलकेच उचलून