My Cold Hearted Boss - 8

  • 4.4k
  • 2.8k

" आय जस्ट हॉप की बॉसचा होणारा नवरा त्यांच्यावर भरभरून प्रेम करेल.. की त्यांना कधी कोणा इतराची गरज भासणार नाही... ", इकडे आदित्य गाडीवर घरी जाताना मनातच त्याच्या बॉस साठी बेस्ट विश करत होता.. अगदी मनापासून......." आई.... ", आदित्य घरात येताच आईला बिलगतो... " काय रे... काय झालं..?? ", आईही त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारू लागल्या..." काही नाही गं.. मिठी मारावीशी वाटली... ", तो म्हणाला आणि मिठी घट्ट केली...आपल्या बॉसच्या तुलनेत आपण किती नशीबवान आहोत हे त्याला समजले होते... भले त्याच्याकडे मोठा बंगला नव्हता... गाड्या नव्हत्या... मोठं नाव नव्हतं... पण त्याच्या कडे त्याची आई होती... जी त्याच्यावर जीव ओवाळून टाकते....