सर येते आणिक जाते - 6

  • 3.4k
  • 1.8k

सहल अगदीच छान आणि एकंदरीत ठरविल्याप्रमाणे पार पडली होती. प्रथमाचा कामाचा क्षीण या सहलीमुळे कुठल्या कुठे पळून गेला होता. आता ती नव्या जोमाने नवीन ऑफिसच्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज होणार होती.घरी येऊन आईला सहलीबद्दल संपूर्ण माहिती दिली. आईलाही प्रथमाचा उत्साहाने द्विगुणित झालेला चेहरा ती वर्णन करत होती त्याहीपेक्षा खूप काही जास्त सांगून गेला.प्रथमा जेवण वगैरे आटोपून आपल्या खोलीत आली. आल्यापासून तिने बॅग जशीच्या तशी, फक्त खोलीत नेऊन टाकली होती, कशालाही हात देखील लावला नव्हता. नाही म्हंणले तरी दिवसभरा नंतरचा थोडा थकवा, मरगळ होताच. त्यामुळे तिला आता प्रचंड झोप येत होती.ती बेडवर आडवी होण्याच्या तयारीत असतानाच तिचा फोन व्हायब्रेट व्हायला