प्रेमाची भन्नाट लागण...

  • 4.2k
  • 1.8k

" अगं ये रताळे...!! म्हंटल ना तुला... मला नाही करायचे तुझ्यासोबत लग्न.. कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं... ", तो भयंकर संतापून म्हणाला...." अरे पण का..!!! ", ती काय मागे हटायला तयार नव्हती... तसं त्याने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला..." वय काय आहे गं तुझं...???", त्याने चिडूनच विचारलं..." पूर्ण सतरा... ", ती लाजूनच म्हणाली.... " पाहिलंस...!! माझ्यापेक्षा तब्बल पाच वर्षांनी लहान आहेस...! काही वाटत नाही का तुला..?? आणि एवढ्या लहान वयात तुला कशाला लग्न करायचं आहे...!!", त्याने चिडूनच विचारलं.." प्रेम आहे ना माझं तुझ्यावर... मग लग्न नको का करायला...????", ती तोंड पाडून म्हणाली...तसं त्याला काय करू नी काय नाही समजत