जंबारी शाळा

  • 1.6k
  • 1
  • 417

जंबारी शाळा म्हापणकर बाईना शाळा तपासनीस म्हणून बढती मिळाली आणि बऱ्याच शिक्षकांची चरफड झाली. बाई वक्तशीर आणि कडक शिस्तीच्या, त्यात अविवाहीत! नि:स्पृह आणि त‌ऱ्हेवाईक म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध! इन्स्पेक्शन घ्यायला आलेल्या शिक्षणाधिकारी गवळी साहेबानी पायताणं घालून सातवीच्या वर्गात प्रवेश केल्यावर बाईनी हात जोडीत त्याना उंबऱ्याजवळच अडवलेनी. अत्यंत विनम्र शब्दात त्या म्हणाल्या, “साहेब, माफ करा..... मुलं जमिनीवर बसलीहेत. कृपया पायीचे जोडे बाहेर काढून ठेवा नी मग आत या. ” साहेब चांगलाच खजिल झाला. वरकरणी दाखवले नाही तरी तो मनातून चांगलाच संतापलेला होता. त्याने मुलांची कसून परीक्षा घेतली. अ‍ॅपण अगदी अवघड गणितं ही वर्गातल्या निम्मे मुलानी बिनचूक सोडवून दाखवली. बाई मुख्याध्यापिका असल्याने कुठेतरी