सर येते आणिक जाते - 7

  • 3.2k
  • 1.4k

  प्रथमाचे मन तिच्या आईला तिच्या पेक्षा जास्त समजत होते आणि यावेळेस ही समजले होते असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. सहलीवरून आल्यापासूनच प्रथमा सर्व प्रवासाबद्दल, तेथील एकंदरीत ॲक्टिव्हिटीज बद्दल, तसेच समोर आलेल्या नाना प्रकारच्या आव्हानांबद्दल, आणि तिला समृध्द करण्याच्या प्रवासात मोलाचा हातभार लावण्याच्या कामी आलेल्या या स्वर्णीम अनुभवाबद्दल आईला भरभरून सांगत होती.   प्रथमा बोलताना आपली टीम आणि इतर सर्व जणांबद्दल कौतुकाने सर्व वर्णन करत होती. पण एका खास व्यक्तीचे नाव वारंवार तिच्या तोंडातून, अगदी प्रत्येक दोन वाक्यांगणीक येत होते. आणि ते नाव घेत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तेज आणि डोळ्यांतील लकाकी काही वेगळीच जाणवत होती. या सर्व गोष्टींपासून