नाटकाचं वेड त्या वर्षी दसरा झाल्यावर नकुल गावडे मुंबईतली खोली विकून कुटुंब कबिल्यासह खामडोशीत वापस आला. गिरणीतून मिळालेला फंड आणि खोलीचे पैसे; मोठी रक्कम बाळगणारी असामी म्हणून गावातले लोक त्याला मान द्यायचे. त्याचा मुलगा शकुनी मुंबईत वाढलेला..... भटासारखा शुद्ध बोलायचा. तसा तो मॅट्रिकच्या उंबऱ्यापर्यंत जावून आलेला. मॅट्रिकला असताना गिरणगावातल्या नाटकवाल्यांच्या संगतीने नाटकात कामं करायच्या नादात परीक्षेत तीनदा आपटी खाल्लीन. झालंच तर कधी मधी घोट ही मारायचा. पण बापूस ठासबंद पिणारा त्यामुळे शकुनीच्या पिण्याची घरात कोणीच फिकीर केली नव्हती. पण गेले पाच सहा महिने नाटकात कामं करणाऱ्या अर्ध्या वयाच्या नटीच्या नादाला लागल्याची कुणकुण बापसाला लागली. त्याच दरम्याने त्याची नोकरी संपली. पोरगा