शिक्षण निःशुल्क करा. प्रवास नाही? *अलिकडे बसमध्ये निःशुल्क सेवा सुरु आहे प्रवास करतांना. अगदी वयोवृद्ध माणसं की ज्याच्यानं चालणं होत नाही. तेही प्रवास करु लागले आहेत आज. कारण बसमध्ये त्यांना निःशुल्क प्रवासाची सोय आहे. शिवाय त्यांचं राहाणं गबाड्याचं दिसत नाही. चांगले ऐटीत दिसतात ते. बऱ्याचशा म्हाताऱ्यांच्या डोक्यावर टोपी असतेच. तसं पाहिल्यास स्वच्छ कपडे असतात. काहीजण धोतर, बंगाली व टोपीत व कडक इस्तरी मारलेल्या कपड्यात असतात की ज्यांच्या कपड्यांना एकसुद्धा डाग लागलेला नसतो. शिवाय हातात स्मार्टफोन असून तो स्मार्टफोन साधा सुधा नसतोच. तर तो कमीतकमी वीस हजार रुपये किंमतीच्याही पुढे असतो. विचारणा केल्यावर कोणी सरकारी नोकरीवर होतो, असं सांगतात तर कोणी