ओढ - प्रेमकथा - भाग 2

  • 3.6k
  • 2.3k

' मी लिहलेले हे डायलॉग किती बनावटी आणी फसवे वाटतात.. याला खरेपणाची किनार असेलही पण मला असं का वाटत की ही भावना, हे असे मर्मबंधी संवाद म्हणजे चित्रपटांमूळे मनाच्या आम्रतरुला मुद्दाम बहरवलेला आल्हाददायी पिवळसर आम्रबहर आहे. तो आम्रबहर तर खरा आहे परंतु अवाजवी मानवी हस्तक्षेपामूळे फुलेलेला तो बहर मुळीच प्राकृतिक नाही. नैसर्गिक छटेच विलोभनीय सौंदर्यही त्याला नाही. मन म्हणजे द्रव्यजनक वस्तू असावी ज्याला कुठलाही विशिष्ट आकार नाही, ज्याला कुठलंही विशिष्ट रंग,रूप नाही.. कुठल्याही साच्यात टाकला की त्याच रूप तो धारण करून घेतो. स्वतःला बदलून त्याच्याशी एकरूप होऊन जातो. ही भावनाही अशीच काहीशी असावी.. रोज रोज नेत्राच्या पडद्यावर चालणाऱ्या फिल्मी जगताच्या