अस्मानची चाँदनी

  • 945
  • 1
  • 270

अस्मानची चान्नी पाणखोलातल्या मुसलमान वाडीतला पिराचा उरुस झाल्यावर तिसऱ्या दिवशी फातुची पात (मच्छिमार होडी) खाडीत लोटून मच्छिमारी करायला विजयदुर्गात रवाना झाली. हमज्या नी फातु ह्यानी खुप शिकस्तीचे प्रयत्न केले पण सगळ काम पुरं व्हायला जानेवारी महिना उजाडलाच. उरुसाच्या आधी दोन दिवस सुतारानी यच्चयावत् सगळं काम पुरं केलेनी. मग़ लगोलग करंजेलाचं चोपडाण काढून पात दर्यात लोटायला तयार झाली. फातु नी तिचा दादला इद्रूस यानी त्या वर्षि उरसाला बोलावलेल्या कव्वाल पार्टीच्या सुपारीची निम्मी रक्कम जमातीला बक्षिस केली. जवळ जवळ सव्वा वर्ष पात बांधायचं काम सुरू होतं. इद्रूस फक्त कुकवाचा धनी! खरी जिकीर केली ती फातूने आणि आपला धंदा उद्योग सोडून पडोसी हमज्या