टूरिंग टॉकिज

  • 2.3k
  • 1
  • 786

टूरिंग टॉकिज “चला चला चला ..... दादा , भाऊ, काका.....ताई , माई, काकू , मावशी.... ठीक साडेसहा वाजता खास लोकाग्रहास्तव पौराणिक सिनेमा सत्यवान सावित्री हा खेळ होणार आहे .... याल तर खुश व्हाल नाही याल तर फसाल .... प्रदिप टुरिंग टॉकिज मध्ये आपलं स्वागत आहे.... ” मॅनेजरचा आवाज घुमला नी पाठोपाठ रंगात रंगलं छंदामधी दंगलं हे त्यावेळी लोकप्रिय असलेलं गीत वाजायला लागल. तिकिटबारी उघडली नी लोकांची एकच झुंबड उडाली. खरंतर चित्रपट सुरु व्हायला अजून अर्धा पाऊण तास अवकाश होता. पण टुरिंग टॉकिज, सिनेमा हे लोकाना नवीनच होतं. महिनाभरापूर्वी नव्यानेच खेळ सुरु झाले तेंव्हा बायाबापड्या तंबूत गेल्यावर पडद्याच्या भोवती फिरून एकीमेकीना