एका लग्नाची गोष्ट

  • 3.5k
  • 1
  • 1.3k

एका लग्नाची गोष्टसाने डॉक्टरांची चिठ्ठी घेवून बाबजी घाडी जनू कुडवाच्याघरी आला. साने डॉक्टरांचा गडी म्हणून मोठ्ठा गुळाचा खडा आणि पाण्याचा गडवा घेवून मथी सावकारीण समक्ष ओटीवर आली. गुळाचा ढेपसा कराकरा खाल्ल्यावर अर्धाअधिक गडवा खाली करून अऽऽऽव् ऽऽऽव् करून ढेकर दिल्यावर बाबजीने मुंड्याच्या खिशातली चिठ्ठी अलगद काढून सावकारणी पुढे टाकली. “हे बागेत माडाच्यो तळयो करूक गेलेहत . सांजावल्यार इले की देतय् ” सावकारणीच्या बोलण्यावर नकारार्थी मुंदी हालवीत बाबजी म्हणाला, “नाय नाय् नाय् ...तसां नाय् . डाक्तरानी च