भुतां रडचत

  • 3.2k
  • 1.1k

भुतां रडचत   ऊं ऽऽ ऊं ऽऽऽऽ ऊं असा गळा काढून रडण्याचा भीषण सूर कानांवर आला. ओसरीवर आप्पा आजोबांच्या कुशीत झोपलेला नातू बाळ्या भेदरून जागा झाला. खोतांच्या घराखाली मळ्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाढलेले सुरमाड, त्यांच्या कवाथ्यात बसून रात्री - बेरात्री कांडेचोर सुर ओढायचे. त्यांचे ओरडणे हुबेहुब माणसाच्या रडण्यासारखे ! दुपारी भेंडीतल्या काळू आत्त्याबरोबर तिची मुलगी मथी आलेली. मथी बाळ्यापेक्षा पावणेदोन वर्षानी मोठी, पण बोलण्यात भारी पाष्ट ! तिच्या घरात आजी, पणजी,परत आलेली आत्ते नि चुलत आज्जी असा सोवळ्या