पड पड आंब्या

  • 2.6k
  • 1
  • 999

पड पड आंब्या पड पड आंब्या गोडांब्या गोडांब्याची कोय कोयमदल्या पोराच्या डोय डोय डोयेक् झाला खाण्डुक खा रे बोडया शेण्डुक बर्व्याच्या आगरात पडीचे आंबे पुंजावायला वाणी वाडी, गिरमे वाडी नी बर्व्यांचे शीव शेजारी दामले नी काळे यांच्या घरातली अशी मिळून जवळ जवळ पंचवीस पोरा पोरींची फटावळ जमलेली. आणखी तासा दोन तासात प्रत्येकाच्या झोळी झारंग्यात चार सहा आंबे नक्कीच जमणार होते. आमचे पणजोबा लहान होते त्या वेळी लखू बर्वा मिरजेच्या पटवर्धन सरकारांच्या चाकरीत कारकून म्हणून रुजू झाला नी वर्षभरात आपला कुटुंब कबिला