तिला मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ती माझ्या समोरच बसली होती. स्पर्धा लवकर सुरु होत नव्हती म्हणून मी आणि माझा मित्र PJ मारत बसत होतो ....कुठल्यातरी जोकवर तिला ही हसू आवरलं नाही..तीने उगाचच एकूण किती स्पर्धक आलेत हे बघण्यासाठी मागे वळून बघितलं आणि मान वळवताना हळूच नजरेच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघितलं.(भौ, पोरींचं हे नजरेच्या कोपऱ्यातून बघणं फार भारी असतं राव... भलेभले निकामी होतात.)तो पर्यंत ती दिसते कशी हे ही मला माहित नव्हतं.फक्त समोर कोणीतरी आपले माणूस बसलयं ह्याची जाणीव संवेदना फार आतून होत होती.स्पर्धा संपल्यावर ती स्वतःहून माझ्याकडे येऊन म्हणाली, तू छान बोलतोस. पण तू तर न बोलताच जिंकलस