कोकणी हिसका

  • 1k
  • 1
  • 378

कोकणी हिसका कॅम्पस इंटर्व्यूसाठी जॉर्डन खुराना केटा सप्लायर्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद घंटांची ऑडी कॉलेजच्या मेनगेट समोर आली नी ड्रायव्हरने खिडकीतून डोकं बाहेर काढताच सिक्युरिटी गार्ड साळुंखे कडक सॅल्युट मारून पुढे जात, “लेफ्ट टर्न लेकर नीले रंगके बिल्डिंग की ओर जाओ’’ असे सांगून बाजुला झाला. सिक्युरिटी जवळ कसलेही सोपस्कार न होता ऑडी आत आली नी थेट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सेल कडे जाऊन थांबली तेंव्हाच जेकेके कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आल्याचं स्कॉलर्सनी ओळखलं. दहा वाजता इंटरव्ह्यू सुरू झाला.विक्रमचा तिसरा नंबर होता. डिरेक्टर घंटा नी त्यांच्या सोबत असलेल्या कुणी मॅडम दोघानीही प्रश्न विचारले. बहूतेक सग़ळे प्रश्न बीई च्या सिलॅबस मधिल टॉपिक्सवर आधारलेले होते.त्यांची बिनचूक उत्तरं