भेट - ( भाग - २ )

  • 5.8k
  • 3.3k

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बक्षीसमारंभ होता पण आम्ही मात्र सकाळपासून कोकणातलं निसर्गसौंदर्य, नागपूरचा उन्हाळा, हापूस आंबे, संत्री..... असल्या विषयांवर गप्पा मारत होतो. साधारणपणे 9.30-10 वाजता मी आमच्या संघांबरोबर बक्षीस समारंभाच्या ठिकाणी पोहचलो. तिकडे व्यासपीठावर नमस्कार -चमत्काराची भाषणं सुरु होती आणि मी शेवटच्या रांगेत बसून नॉनस्टॉप चॅट करत होतो." आदित्य, तुला निकालाची भिती वाटत नाही का ? मला तर अजूनही काही खरं वाटत नाही आमच्या संघाचं ... तिच्या या प्रश्नावर प्रभु वक्त्यांसारखा मी पण एक इंग्रजी कोटेशन तिला ऐकवलं.'गप ना रे... स्पर्धा संपली आहे ना आता ? कशाला उगाचच ....या तिच्या रिप्लायला मी' ह्या ह्या ह्या'.. एवढाच रिप्लाय दिला.यथावकाश निकाल जाहीर झाला.