देवकळा

  • 4k
  • 1
  • 1.3k

देवकळा खांद्यावर ठासणीची बंदूक आणि हातात भलामोठा दांडा घेऊन संध्याकाळच्या वेळेस भिवा टिपवण्याकडे निघालेला. बहुतेक सशाच्या पारधीला निघालेला असावा असेच बघणाऱ्याना वाटले असते. पण, आजची शिकार मोठी होती आणि वेगळीही होती. उभ्या रानात वाघ समोर आला तरी त्याला अंगावर घेण्याची हिंमत असलेला भिवा यापूर्वी एकदा याच शिकारीला जाऊन कच खाऊन माघारी फिरला होता, कारण सावज साधेसुधे नव्हते. खोत वकील म्हणजो काही डुक्कर नव्हता कि दिसला आणि घातली गोळी. दशक्रोशीत खोत वकिलाचा लौकीक. वकिली मुळे कोर्ट दरबारी,पोलिस स्टेशनवर