टाळी एका हातानं वाजत नाही

  • 2.6k
  • 1.1k

टाळी एका हातानं वाजत नाही? आत्महत्या...... नेहमीच आजच्या काळात आत्महत्या होत असलेल्या दिसत आहेत. त्यात वाढ होत असलेली सातत्यानं जाणवते. कारण दररोजच वर्तमानपत्रातून तशा स्वरुपाच्या बातम्या प्रकाशित होत असलेल्या दिसतात. अशाच स्वरुपाची एक बातमी प्रकाशित झाली. ती पोलीस शिपायाची. बातमी होती, एका पोलीस शिपायाच्या आत्महत्येची. त्याचा पत्नीवर संशय होता व तिचं बाजारात जाणं वा कामानिमित्त बाहेर जाणं त्याला खटकलं होतं. मात्र या घटनेत गुन्हा तिचा असेल की नसेल यावर प्रश्नचिन्हं ओढता येत नाही. संशय...... संशय का बरं निर्माण झाला असेल त्याच्या मनात. त्याला काही कारण असेल काय? असू शकेल काय? असे विचार केल्यास असूही शकेल व नसूही शकेल. कधी कधी