ओढ प्रेमाची.... - 10

  • 3.9k
  • 2.1k

माया आणि राकेश च प्रेम छान फुलत चाल होत. त्यांच्या या नात्याला चांगलाच वळण लागलं होत, एक सरळ वेगवान वाट होती त्यांच्या या प्रेमाची गाडीची, अगदी नजर लागावी अशी त्यांची जोडी पूर्ण कॉलेज मध्ये प्रसिद्ध झाली होती. रकेशचे सगळे मित्र मायाला वहिनी म्हणू लागले होते. मायाला कोणी या नावाने आवाज दिला तर ती लाजून छान हसायची. मायाच्या सगळ्या मैत्रिनीना तिला असं हसताना पाहून खूप आनंद होत होता. पण म्हणतात ना चांगल्या रस्त्यात पण एखादा खड्डाअसतो. तसा त्यांच्या या वाटेत मनोज नावाचा खड्डा नेहमी त्यांचा सोबतच असायचा. मनोज आणि राकेश अगदी लहानपणीचे मित्र होते. राकेश मनोजला सांगितल्या शिवाय काहीच करत नव्हता