त्रासाला आपलं शस्र बनवावं.? त्रास.......त्रासाबाबत सांगायचं झाल्यास काही लोकांना भयंकर त्रास होत असतो तर काही लोकांना काहीच त्रास होत नाही. ज्यांना त्रास होत नाही. ते अतिशय भाग्यवान लोकं असतात. अन् ज्यांना अतिशय वेदनादायी त्रास होत असतो. ते कमी भाग्याचे असतात. तसं पाहिल्यास त्रासाचा पुनर्जन्माशी काहीही संबंध नाहीच. कारण काही लोकं पुनर्जन्माला मानत नाहीत. ते पुनर्जन्माला थोतांड असं संबोधतात. पुनर्जन्म असतो काय? याचं उत्तर होय आणि नाही असं संभ्रमाचं आहे. मागील जन्मात आपल्या काही इच्छा अपुर्ण राहिलेल्या असतात. त्या इच्छा पुर्ण झालेल्या नसतात. त्या पुर्ण करण्यासाठी पुनर्जन्म असतो. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. पुनर्जन्म हा कुणाच्याही रुपात होवू शकतो. साहजीकच एखादे