रानभूल

  • 3k
  • 1
  • 852

मिरगाची शितडी पडली आणि पाऊस खराच झाला. पुढच्या चार दिवसात हरोहार दमदार सरी पडल्या नी सड्याशिवराची कळा परतली. काळ्या करंद कातळावर खाचाखोचातून व्हावटीचं पाणी साठल्यावर चार दिवसा गवताचं बी तरारून आलं नी आख्या कातळावर पोपटी गोधडी आंथरल्या सारखी कळा आली. व्हावटीच्या पाण्याने उन्हाळी पायवाटांचा मागमूसही उरला नाही. सड्यावरून वहात खाली मळ्यात जाणाऱ्या वहाळाला हऊर आला नी जोरगतीच्या भरतीच्या ताणावर पाणी तुंबून अर्धा मळा हौराच्या पाण्याने भरला. सड्यावरून गावदरीत येणाऱ्या ओहोळातून कुरल्या, मासे चढणीच्या पाण्यातून विणी काढाण्यासाठी सडा गाठायला लागले. एरव्ही ओसाड पडलेल्या सड्यावर इतस्तत: विखुरलेल्या दगड गोट्यांच्या आडोशाने कुरल्या पळताना दिसायला लागल्या. डबक्या डबक्यातून साठलेल्या पाण्यात बेडकानी आणि माशानी अंडी