थरार काळरात्रिचा

  • 6.7k
  • 1
  • 2.8k

खेळ काळरात्रीचा भाग१हिरव्यागार झाडीतून वळणे घेत-घेत एस. टी. धामणगावात शिरली. लाल-पिवळ्या मातीचा धुरळा वावटळीसारखा उठला. त्या पाठोपाठ दहा-बारा कोंबड्या गलका करीत उडल्या व दगडी कुंपणावर जाऊन बसल्या. रस्त्यावर खेळणारी शेंबडी 'पोर झपाझप बाजूला झाली. माना वर करुन खिडकीत कुणी ओळखीचा दिसतो का ते पाहू लागली. | मास्तर गावात पक्का रस्ता नाही का? मी सहजपणे कंडक्टरला विचारले." होता की. पण आता रस्त्याचा धुरळा झालाय."कंडक्टर त्रयस्थपणे म्हणाला." बर. प्राथमिक शाळा आली की मला सांगा. "" सांगायच काय? अगदी शेवटचा स्टॉप आहे तो. "मी पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागलो. गाव छोटासा होता. अस्ताव्यस्त दाणे फेकल्यासारखी घर इकडे-तिकडे दिसत होती. काही घर दगडी, 'काही मातीची