सर येते आणिक जाते - 11

  • 2.6k
  • 882

      आई पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल जे बोलली ते अगदी खरे होते आणि आहे. आपण पहिल्यापासूनच त्या गोष्टीकडे, म्हणजेच पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळे ठेवण्याबद्दल कायम सतर्क राहिलो आहोत, कायम लक्ष दिले आले. पण खरंच त्या एका दिवसामुळे खूप अपराधी वाटत आहे. इमेज बनवायला आयुष्य कमी पडते. पण ती खराब व्हायला एक छोटासा क्षण देखील पुरेसा असतो. या गोष्टींची तोंडी जाहिरातबाजी होत असते आणि ती होऊन तिचा गावभर बोभाटा व्हायला आजकालच्या सोशल मिडीयाच्या काळात अजिबात देखील वेळ लागत नाही.    त्यामुळे प्रथमा आता इथून पुढे जास्त सतर्क राहणार होती. आणि इथून पुढे असे कधीही घडणार नाही याची काळजी