मैत्री

  • 4.6k
  • 2
  • 1.7k

"मैत्री" हा शब्द दिसायला फार छोटा आहे पण या शब्दामध्ये ईतकी मोठी ताकद आहे की, त्याला शब्दाची गरज नाही...गरज आहे ती भावनेची.... मैत्री ही एक अतिशय सुंदर भावना आहे. खरंतर आजकालच्या जगात खरे मित्र/मैत्रिणी मिळणं खूपच कठीण आहे पण ज्या व्यक्तीला खूपच चांगले मित्र-मैत्रिणी आहेत माझ्या दृष्टीने ती व्यक्ती जगातील सर्वात भाग्यवान आहे. एकमेकांसाठी वाटेल ती संकटं झेलण्यासाठी तयार असलेले लोक सोबत असणं म्हणजे जीवनाला एक प्रकारचा आधारच. सध्याचे युग हे "सोशल मीडियाचे" युग आहे. सोशल मीडियाचा कधी कधी आपल्या मैत्रीवर चांगला तर कधी खूपच वाईट प्रभाव पडतो. चांगला प्रभाव या अर्थाने की, त्यामुळे आपल्यापासून दूर ठिकाणी राहणाऱ्या लोकांसोबत नेहमीच