स्वयं भगवान उवाच

  • 2.2k
  • 1
  • 699

स्वयं भगवान उवाचतीक्ष्ण नजरेने सावज हेरीत, सावध पावले टाकीत व्याध फिरत होता. बाणाच्या पल्ल्याबाहेर एका प्रचंड वृक्षाच्या बुंध्याआडून मृगाचे मुख दिसताच व्याध थांबला. थोडा वेळ वाट पाहूनही मृग पुढे येण्याचे चिन्ह दिसेना. व्याध दबकत-दबकत मृगाच्या दिशेने पुढे निघाला. लक्ष्य बाणाच्या टप्यात येताच तो थांबला. मनमुराद चरुन तृप्त झालेला तो मृग वृक्षतळी बसून रवंथ करीत असावा, या गोष्टीचा अंदाज व्याधाला आला. आता वेळ घालवून चालणार नाही. मृग पुढे येईल अन् त्याच्या हृदयाचा वेध घेता येईल ही शक्यताच आता संभवत नव्हती. व्याधाने पाठीवरच्या भात्यातून एक विषमुख बाण काढून धनुष्यावर सिद्ध केला. मृग मुखाचा अचूक वेध घेत त्याने प्रत्यंचा आकर्ण खेचली. धनुष्यातून बाण