प्राक्तन -१० " आणि यश तुला अजून एक विचारू, पण खरं सांगायचं हं.. लपवाछपवी किंवा उडावाउडवीची उत्तरं नाही द्यायची. " तिने आधीच बजावलं त्याला. त्यावरून आता ही काय बॉम्ब टाकणार या विचाराने तो तिच्याकडे बघायला लागला. आणि त्याने तिला 'बोल बिनधास्त' असा इशारा केला. " प्रेमाबद्दल तुझं मत काय आहे? आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं का?" ती विचार करत म्हणाली. " अरे प्रेम हा कधीच न आटणारा झरा आहे. आणि हो ते एकदाच नाही अनेकदा होतं अगदी आपल्याही नकळत... पाडगावकर म्हणतात ना प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..." त्याने सांगितलं. पण यावर तिचं समाधान झालेलं दिसत नव्हतं.