सावली मग तातडीने घराकडे जाण्यास नीघाली होती. ती लगबगीने घरी पोहोचली आणि गाडी ठेवून घरात जाऊन शिरली. तीची आई आणि कोमल हि सोफ्यावर बसून कसले तरी रीपोर्ट बघत होत्या. तीचा आईने तीला जीतक्या तातडीने घरी येण्यास सांगीतले होते, ती घाई तीचा चेहरयावर दिसत नव्हती सावलीला. उलट एक समाधान आणि आनंद दिसत होता. ते बघून मात्र सावली आधी आश्चर्यचकित झाली आणि नंतर रागावली होती. ती सरळ जाऊन आईला म्हणाली, “ आई इतकी कसली महत्वाची गोष्ट होती ग तुला सांगायची कि तू मला इतक्या तातडीने येण्यास सांगीतले. तुझा तो आवाज आणि बोलने ऐकून एका क्षणाला मला वाटले होते कि काही मोठे संकट